स्त्री शक्तीचा सन्मान ही आपली संस्कृती : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी


फैजपूर : नारी शक्तीचा सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. नवरात्री उत्सव हा देवीचा जागर असतो. स्त्री शक्तीला आपण देवीच्या रूपात पाहिलं पाहिजे, असे विचार सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित निष्कलंक धाम वढोदे येथे कुमारीका (कन्या) पूजन विधी करण्यात आला. यावेळी महाराजांनी परीसरातून सजून0धजून आलेल्या शेकडो कुमारीकांचे चरण धुवून पुसून त्यांचे पूजन केले.. त्यांना सन्मानपूर्वक स्वादिष्ट भोजन खाऊ घातले. पुरी, भाजी, खीर, पाणीपुरी, ऊसाचा ताजा रस दिला. त्यानंतर प्रत्येकीला भेटवस्तू देण्यात आल्या व त्यांचा सन्मान केला. यावेळी एकदंत महाराज, फैजपूर येथील पांडुरंग सराफ, अ‍ॅड.संदीप भंगाळे, पत्रकार तसेच सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !