वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तपले असताना गुरुवारी सकाळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी केल्यानंतर खळबळ उडाली. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले. मंगेश साबळे यांनी काही दिवसापूर्वी स्वत:ची गाडी पेटवत निषेध केला होता.

गेवराई पायगा गावचे सरपंच गाडी जाळल्याने चर्चेत
मंगेश साबळे हे वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे चर्चेत असतात. मंगेश साबळे हे संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. याअगोदर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे ते चर्चेत होते. साबळे यांनी काही दिवसापूर्वी पंचायत समितीसमोर पैसे उधळत आंदोलन केले होते. या आंदोलनाची माध्यमांनीही दखल घेतल्याने अखेर लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आले होते. यामुळे मंगेश साबळे चर्चेत आले होते. विहिरीच्या योजनेसाठी अधिकारी पैशाची मागणी करतात असा त्यांनी आरोप केला होता.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !