इस्रोचे वैज्ञानिक रविवारी साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद


भुसावळ  : सुप्रवाह स्कॉलर्स यांच्या वतीने आयोजित अबॅकस व स्पेलिंग कॉम्पिटिशनमधील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण ताप्ती पब्लिक स्कूलच्या सभागृहात रविवार, 29 रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी अहमदाबाद येथील इस्रोचे माजी वैज्ञानिक भरतभाई चनेरिया व रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. ताप्ती पब्लिक स्कूलमधील सभागृहामध्ये अबॅकस व स्पेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन सप्रवाह स्कॉलर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
बक्षीस समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी इस्रोचे माजी वैज्ञानिक भरतभाई चनेरिया उपस्थित राहतील. यावेळी ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना गेल्या दशकामध्ये इसरो या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मोहिमांविषयी बोलतील. अवकाश व पृथ्वी यामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध अभ्यासामुळे माणसाच्या प्रगतीला चालना कशी मिळते तसेच देश सेवेसाठी इसरो या संस्थेच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात याबाबतची माहिती देत खगोलशास्त्रावरील विविध माहिती पीपीटीद्वारा यावेळी विद्यार्थी व पालकांना सांगितली जाणार आहे.

यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन मालक, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे व्हॉइस चेअरमन सुनील वानखेडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख डीसीपीएसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युनिव्हर्सल पब्लिक स्कूलचे संचालक प्रतिभा तावडे, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर, ग.स.सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रदीप सोनवणे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल पूजा बोरोल,े सतीश नवलखे, वैशाली कुलकर्णी, वर्षा लोखंडे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती सप्रहा स्कॉलर्सचे जिल्हाप्रमुख अमिता जोशी, संचालक सपना सोनार व राहुल सोनार यांनी दिली.


कॉपी करू नका.