अडीच वर्ष बिळात घुसलेले हे तर खिचडी, कफन चोर !

भुसावळात देवेंद्र फडणवीस यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टिका

0

Khichdi, a shroud thief, who has been in the hole for two and a half years! भुसावळ : कोरोना काळात अडीच वर्ष तुम्ही घराच्या बिळात घुसून बसले आणि रुग्णांच्या खिचडी व कफनमध्ये तुम्ही अपहार केला व वरून आम्हाला बिळातून बाहेर काढून मारण्याची भाषा करता मात्र खर्‍या अर्थाने तुम्हीच कफन व खिचडी चोर आहात, अशी बोचरी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळात केली. मातृभूमी चौकात भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांची जाहीर सभा झाली. जळगावात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला फडणवीस यांनी भुसावळात जोरदार उत्तर दिले.

देश मोदींसोबत मात्र काँग्रेस अजमल कसाबसोबत
फडणवीस आपल्या आक्रमक शैलीत म्हणाले की, आम्ही मुंबईतून अ‍ॅड.उज्वल निकम यांना उमेदवारी दिली मात्र विरोधक आता त्यांच्यावर टिका करीत आहेत. पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे शहीद झाल्यानंतर त्यांना अजमल कसाबने गोळी मारली नाही, असा दावा आता काँग्रेस करीत आहे मात्र जेथे न्यायालयाने ही बाब मान्य केली असताना काँग्रेस मात्र अजमल कसाबचे समर्थन करीत असल्याची बाब लाजीरवाणी असल्याचे ते म्हणाले.

सुरक्षित हातात देश देण्याची जवाबदारी आपली
फडणवीस म्हणाले की, ही गल्लीची निवडणूक नाही तर दिल्लीची निवडणूक आहे त्यामुळे सुरक्षित हातात देश देण्याची जवाबदारी आपली आहे. देशात मजबूत महायुतीचे सरकार आहे मात्र विरोधकांकडे पंतप्रधान होईल, असे एकही नेतृत्व नाही कारण विरोधकांच्या रेल्वेला डबेच नाही केवळ इंजिनच आहेत त्यामुळे त्यांच्यात पीएम कोण होणार यावरून भांडणे सुरू आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात देश महासत्ता होत असून मोदीजींचे नेतृत्व पाहून अर्थशास्त्री देखील चकीत झाल्याचे ते म्हणाले. कोरोना काळात देशातच लस तयार झाली हे केवळ मोदीजींचे श्रेय आहे व शंभर देशांचे लोक आता मोदीजींना नेता मानत आहेत, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.