महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून आणणार !

आमदार राजेश एकडे : मलकापूरात श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0

Mahavikas Aghadi candidate Shriram Patil will be elected! मलकापूर : रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना 25 हजारांचा लीड देण्याचे तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

श्रीराम पाटील यांना निवडून आणणार
गत काळात भारतीय जनता पार्टीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातून 62 हजारांची लीड मिळाला होता मात्र कोणतेही विकासकाम या मतदारसंघात झाले नाही. येणार्‍या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील यांच्यासारख्या उमद्या उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे , असे आमदार एकडे यावेळी म्हणाले.

सत्ताधारी आपल्याच नशेत : काँग्रेसचे नेते कोलते
काँग्रेसचे नेते कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीराम पाटलांना निवडून आणावे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, अ‍ॅड.साहेबराव मोरे, डॉ.अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस.पी.संभाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, काँग्रेसचे शिरीष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नारू शेठ नेहलाणी, श्यामभाऊ राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे, आता उरहमान जमादार सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.


कॉपी करू नका.