भुसावळात तालुक्यातील कृषी विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग
Participation of agricultural sellers in Bhusavalat taluka in the bandh भुसावळ : विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी केंद्र चालक 2 ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान आपापली दुकाने बंद ठेवणार असून या संपात भुसावळ तालुक्यातील चालक सहभागी होणार आहेत. या संदर्भात भुसावळ तहसील कार्यालयासह कृषी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
नवीन कृषी विधेयकाला विरोध
गत पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विषयक सुधारणांमध्ये नव्या कायद्याचं आवाहन केलं होते. त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली नवीन कृषी विधेयके ज्या विधेयक क्रमांक 40 ते 44 या दरम्यान असलेल्या विधेयकांमध्ये दिलेल्या शिक्षेच्या तरतुदीविषयी व एमपीडीए सारख्या गंभीर गुन्हेगारी वृत्तीचा संदर्भ दिला असल्याने कृषी विक्रेत्यांचा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रोष आहे. त्या अनुषंगाने राज्यातील माफदा संघटनेतर्फे 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान 70 हजार कृषी विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे.

35 विक्रेत्यांचा सहभाग
भुसावळ तालुक्यातील 35 विक्रेत्यांनी निवेदनावर सह्या देऊन त्या बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. हा बंद तालुक्याप्रमाणेच राज्यभरात असून यावेळी भुसावळ तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोपडे, उपाध्यक्ष धीरज रणवाल, रवी जंगले व तालुकाभरातून कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









