खासदार संजय राऊतांची टीका : पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार !
MP Sanjay Raut’s Criticism: The Prime Minister Suffers from a ‘National Disease’ of Lying! मुंबई (19 एप्रिल 2026) : लोकसभेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केल्यानंतर त्यांच्या भाषणावरून खासदार संजय राऊत त्यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलत आहेत याकडे देश गांभीर्याने पाहत नाही. ते आचारसंहितेचा भंग करत आहेत. खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार त्यांना जडलेला आहे. 2023 साली मंजूर झालेलं महिला आरक्षणाचं विधेयक यांनी अद्याप अंमलात आणलेले नाही. याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. डीलिमिटेशन बिल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही आणत होता, त्याचा पराभव झाला आहे. हे राष्ट्रावर संकट नसून भारतीय जनता पक्षावर संकट आहे. भारतीय जनता पक्षाच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधित करणं हा मूर्खपणा असल्याची त्यांनी केली असल्याचे राऊत म्हणाले.
काँग्रेसशिवाय देशाला नेतृत्व नाही
महिला आरक्षणाच्या नावाखाली जे छाती पिटून घेताय, आक्रोश, ढोंग करताय, त्यांनी 2023 साली संसदेत काय झाले ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. मोदींच्या कालच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते मात्र त्यांच्या डोक्यातून अद्याप काँग्रेस गेलेली नाही. मोदी कळत नकळतपणे सांगत आहेत की, काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. मोदी त्यांच्या कृतीतून वारंवार हे सिद्ध करत आहे, अशी टीकादेखील संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

त्या महिलांचा आक्रोश यांना दिसत नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, मोदींना कधी लव्ह जिहादच्या नावाखाली तर कधी धर्मांतराचे मुद्दे, तर कधी कोणी काय खावे असे मुद्दे निर्माण करून हा देश कायम पेटवायचा असतो. पण, त्यांना असे कधीही वाटत नाही की, काश्मीरमधील पहलगाम, पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले. त्यांच्या सुद्धा माता भगिनी या महिला आहेत. त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधीही दिसला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय.


