भुसावळात एकता दौड :विविध कार्यक्रमातून माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन

भुसावळात एकता दौड : ठिकठिकाणी प्रतिमा पूजनासह मिरवणुकीचे आयोजन


भुसावळ : स्वतंत्र भारताचे माजी गृहमंत्री, अखंड भारताचे निर्माते, दूरदर्शी राजनेता तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना 148 व्या जयंतीनिमित्त शहर व परीसरात विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. भुसावळ डीआरएम कार्यालयात एकता दौड तर सावदा येथे प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली.

काँग्रेसतर्फे पुतळ्यास माल्यार्पण
भुसावळ : स्वतंत्र भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी पुतळयास माल्यार्पण केले. भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधीं यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर सरचिटणीस संतोष साळवे, सलीम गवळी यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर वानखेडे, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश उपाध्यक्ष मुन्वर खान, शहर सचिव अजगर भाई, अतुल पानपाटील, संतोष पगारे, जसपालसिंग गील उपस्थित होते.

द वर्ल्ड स्कूल, भुसावळ
भुसावळ : कोलते फाऊंडेशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रीशा ह्यसेट यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक व शिक्षकवृंद, कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

भाजपा कार्यालय, वरणगाव
वरणगाव : अखंड भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती वरणगाव भाजपा कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष ए.जी.जंजाळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील, शहर अध्यक्ष मिलिंद भैसे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनील महाजन, गोलू राणे, हितेश चौधरी, शालिग्राम विषय, संतोष पाटील, आकाश निमकर, शामराव धनगर, यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

वरणगाव महाविद्यालय
वरणगाव : कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पवार अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र
भुसावळ : औष्णिक वीज निर्मिती केंद्रात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती नवीन क्रीडा भवनात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिका लेखिका सीमा भारंबे, उपमुख्य अभियंता प्रशांत लोके, रवींद्र सोनकुचरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, अधीक्षक अभियंता रवींद्र डांगे, पांढरपट्टे समितीचे सचिव सतिष महाजन उपस्थित होते. कोरोना काळापासून ते आतापर्यंत वारंवार रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचा गौरव महादेव फटाका एजन्सी, वरणगाव यांच्या सौजन्याने करण्यात आला. समितीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. प्रास्ताविक विनोद भिरूड यांनी केले.

भुसावळ मंडळात राष्ट्रीय एकता दिन
भुसावळ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंगळवारी सकाळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर एकता रनचे आयोजन करण्यात आले. सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी, आर.पी.एफ स्टाफ, भारत स्काउट्स आणि गाईड्स, क्रीडा संघटनांचे सदस्य आणि रेल्वे शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्याहस्ते राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले.

सावदा येथे प्रतिमेची मिरवणूक
सावदा : शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी नगरपालिकेत अभिवादन करण्यात आले. सायंकाळी दुर्गा माता मंदिरापासून सजविलेल्या रथात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सुरवातीस सोमवारगिरी मठी येथील कृष्णगरीजी महाराज, महानुभाव मठातील आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर, सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यकनिरीक्षक जालिंदर पळे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी आदींच्या प्रतिमा पूजन करून मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीत सजविलेल्या रथावर सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा, दुसर्‍या एका रथावर भव्य असे शिवलिंग तर दुसर्‍या रथावर राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली. बॅण्डच्या तालावर निघालेली मिरवणूक इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, शिवाजी चौक, मोठा आड मार्गे क्रांती चौकात येऊन समाप्त झाली. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. संभाजी चौकात डॉ.केतकी पाटील यांनी मिरवणुकीत येऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मिरवणुकीत सावदा व परीसरातील सकल लेवा समाज, कार्यकर्ते तसेच सावदेवासी नागरीक सहभागी झाले. यशस्वीतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल जयंती समितीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.