जळगाव जिल्ह्यातील 54 हजार शेतकर्‍यांना मिळणार फळ पीक विम्याचा लाभ

खासदार रक्षा खडसे यांची माहिती : दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम


54 thousand farmers of Jalgaon district will get the benefit of fruit crop insurance मुक्ताईनगर : पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना आंबिया बहार 2022 मध्ये एकूण 78 हजार शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा काढला होता मात्र शेतकर्‍यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने त्यांना भरपाईची प्रतीक्षा होती. शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केल्यानंतर प्रलंबित 54 हजार शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वीच बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

24 हजार शेतकर्‍यांना नाकारला लाभ
पीक विमा उतरविलेल्या एकूण 78 हजार पैकी 54 हजार शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. 11 हजार शेतकर्‍यांनी पीक न लावता विमा उतरविलेला असल्याचे तसेच 13 हजार शेतकर्‍यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचे पिक विमा कंपनीच्या सर्वेक्षणात आले असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. योग्य पद्धतीने विमा उतरविलेला असताना त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही, अश्या शेतकर्‍यांनी आपापल्या तालुक्यातील कृषी कार्यालयात सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

या महसूल मंडळात मिळणार विम्याचा लाभ
खासदारांच्या कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, रावेर मंडळातील खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा, रावेर, खानापुर, ऐनपूर तर चोपडा मंडळातील अडावद, लासूर, धानोरा प्र.चोपडा, गोरगावले, हातेड बु., चहार्डी
तसेच मुक्ताईनगर मंडळातील घोडसगाव, अंतुर्ली, कुर्‍हा, मुक्ताईनगर व यावल मंडळातील भालोद, साकळी, किनगाव बु., बामणोद, यावल, फैजपूर, भुसावळ मंडळातील वरणगाव, पिंपळगाव खुर्द, भुसावळ तसेच जामनेर मंडळातील नेरी, शेंदुर्णी, मालदाभाडी, जामनेर, पहूर मंडळातील शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.


कॉपी करू नका.