पिंप्री शिवारातून बैलगाडी लांबवली
रावेर : तालुक्यातील पिंप्री शिवारातून अज्ञात चोरट्याने वाड्यासमोरुन सुमारे दहा हजार रुपये किंमतीची बैलगाडी लांबवल्याची घटना 4 ते 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंप्री येथील शेतकरी शांताराम महाजन यांच्या गट क्रमांक 88 मधील शेतासमोर असलेल्या वाड्यासमोरुन 4 ते 5 च्या मध्यरात्रीच्या सुमारास दहा हजार रुपये किमतीची पुर्ण लोखंडाची असलेली बैलगाडी चोरट्याने लांबवली. शेतकरी शांताराम महाजन यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.
