सातपुड्यातील आदिवासी परीवारासोबत फेगडे परीवाराची दिवाळी

उपक्रमातुन येणार्‍या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार : डॉ. कुंदन फेगडे


Diwali of Fegde family with tribal family of Satpuda यावल : सालाबादाप्रमाणे यंदादेखील यावल शहरातील फेगडे कुटुंबीयांनी आदिवासी विटवा पाडा, ता.यावल येथे आदिवासी परीवारासोबत दीपोत्सव साजरा केला. आदिवासी पाड्यावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमातुन येणार्‍या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार घडावे या उद्देशाने सहकुटुंब दिवाळीत आपण गोर-गरीब, गरजुंच्या चेहर्‍यावर आनंद फुलवला असल्याचे आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले.

परीवारासोबत साजरी केली दिवाळी
विटवापाडा, ता.यावल येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपला दिवाळी सण आदिवासी दुर्गम परीसरातील आदिवासी परीवारासोबत सहकुटुंब साजरा केला. सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गोरगरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी, त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने व येणार्‍या पिढीलादेखील आपण समाजाप्रती देणं लागतो, असे संस्कार घडावे या उद्देशातुन राबवत असल्याचे प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले. दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आदिवासी वस्तीवर जावुन सहकुटुंब दिवाळी साजरी करतात.

यंदादेखील त्यांनी विटवा आदिवासी पाड्यावर जावून फराळ, मिठाई, अंघोळीसाठी उटण व साबण, पणती लहान मुलांना फटाके वितरीण केले. यावेळी डॉ.कुंदन फेगडे, शैलेंद्र फेगडे, डॉ.जागृती फेगडे, दिनेश बारेला, सागर लोहार, मनोज बारी, दीपक फेगडेंसह आदिवासी बांधव उपस्थित होते.


कॉपी करू नका.