धुळे एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा


Torture case against the then Inspector Hemant Patil of Dhule LCB धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक व नंदुरबार नियुक्त पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून सुरूवातीला विनयभंगाचा गुन्हा देवपूर पोलिसात दाखल होता मात्र पीडीतेने न्यायालयात दिलेल्या जवाबानंतर या गुन्ह्यात आता 376 (1) प्रमाणे अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले असल्याची माहिती धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. दरम्यान, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आली असून त्यांचा अद्याप शोध लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिलेला धमकी : निरीक्षकांविरोधात गुन्हा
सन 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडीतेकडे शारीरीक सुखाची मागणी केली तसेच अश्लील वक्तव्य करीत महिलेला कपडे काढण्यास भाग पाडून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे व पीडीतेच्या आरोपावरून या प्रकरणी निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच व्हिडिओ व्हायरलनंतर महिलेला वाच्यता केल्यास तुझे मरण जवळ आले आहे, अशी धमकी निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या साथीदारांनी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केल्यानंतर सोमवारी पीडीतेने न्यायालयात जवाब नोंदवल्यानंतर या गुन्ह्यात निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात 376 (1) प्रमाणे अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले असल्याची माहिती धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

तपास धुळे शहर निरीक्षकांकडे
पीडीतेच्या तक्रारीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल असून तेथे निरीक्षक घोटेकर आहेत मात्र ते 2000 चे निरीक्षक पाटील यांचे बॅचमेट असल्याने हा तपास शहर निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

निरीक्षकांचा पोलिसांकडून कसून शोध
गुन्ह्यात संशयित सलेल्या पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. कल्याण येथेदेखील त्यांचा शोध घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक रीवॉर्ड : गुन्ह्यांचे डिटेक्शन
हेमंत पाटील हे एलसीबीत असताना त्यांनी गुन्ह्यांची व केलेल्या कामगिरीच्या आधारावर त्यांना अनेक रीवॉर्डदेखील मिळाले आहे शिवाय अनेक गुन्ह्यांची उकलदेखील त्यांच्या काळात झाली मात्र आधी विनयभंग व नंतर अत्याचाराचा आरोप त्यांच्यावर झाल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचीदेखील दबक्या आवाजात चर्चा होत आहे.


कॉपी करू नका.