धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांचे अखेर निलंबन

0

The then Inspector Hemant Kumar Patil of Dhule Local Crime Branch has finally been suspended धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक व नंदुरबार नियुक्त पोलिस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून सुरूवातीला विनयभंगाचा व न्यायालयातील जवाबाअंती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षकांच्या गैरवर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी निलंबन केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आधी विनयभंगाचा व नंतर अत्याचाराचा गुन्हा
सन 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडीतेकडे शारीरीक सुखाची मागणी करीत अश्लील वक्तव्य करीत धमकी दिल्याचा आरोप आहे. पीडीतेच्या आरोपावरून या प्रकरणी निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात देवपूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर पीडीतेने न्यायालयात दिलेल्या जवाबानंतर निरीक्षक हेमंत प्रभाकर पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षकांच्या निलंबनाने खळबळ
महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांचे शासकीय सेवेतून निलंबन केले आहे. नंदुरबार पोलिस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडू नये व तसे केल्यास ती शिस्तभंगाची कारवाई मानली जाईल, असे आदेशात नमूद आहे.


कॉपी करू नका.