यावल तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेचा आंदोलनास पाठींबा


यावल : यावल तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेकडून मुंबई येथे होणार्‍या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या संख्येने पोलिस पाटील मुबई येथे आंदोलनात जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलन व विविध मागण्यांचे निवेदन पोलिस पाटलांनी तहसील कार्यालयासह विविध ठिकाणी दिले आहे.

मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा
यावल तालुक्यातील पोलिस पाटलांनी तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यासह विविध ठिकाणी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलिस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील पोलिस पाटील सहभागी होणार आहेत. याबाबतचे व विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी प्रशासनाकडे दिले

यांची निवेदन देताना उपस्थिती
प्रसंगी राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी, जिल्हा संघटक अशोक पाटील, पोलिस पाटील सुरेश खैरनार, राजरत्न आढाळे, लक्ष्मण लोखंडे, नरेश मासोळे, प्रफुल्ल चौधरी, युवराज पाटील, ललिता भालेराव, मुक्ता गोसावी, महमूद तडवी, सलीम तडवी, निलेश सोनवणे उपस्थित होते. अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन, आंदोलन, बैठका घेतल्या परंतू अद्यापपर्यंत शासनाने त्यावर योग्य निर्णय घेतला नसल्याने संघटनेने उपोषणाचा मार्ग निवडल्याचे निवेदनात म्हटले आहे.


कॉपी करू नका.