रावेर लोकन्यायालयात पुन्हा फुलला दुभंगलेला संसार

दिवाणी व फौजदारी 113 खटल्यांचा निपटारा : दहा लाख रुपये वसुल


A divided world bloomed again in Raver Lokayalaya रावेर : दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी.पी.यादव अध्यक्षस्थानी होते. लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाचे 35 तर फौजदारी स्वरूपाचे 81 खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. विविध बँका, शासकीय संस्था, बी.एस.एन एल., ग्रामपंचायतीच्या व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इत्यादींच्या दाखल पूर्व खटल्यांमध्ये सहा लाख साठ हजार रुपये वसुल करण्यात आले तर दाखल खटल्यांमध्ये तीन लाख पंधरा हजार रुपये वसुल करण्यात आले. एकूण दहा लाख रुपये वसुल झाले.

जोडप्याचा संसार फुलला
एका जोडप्याचा दोन वर्षांपासून दुभंगलेला संसार पुन्हा फुलविण्यात यश आले.पत्नीने पतीविरुद्ध कौटुंबिक छळापासून महिलांचे संरक्षण या कायद्यांतर्गत रावेर न्यायालयात खटला दाखल केला होता. या दोघांना एक मुलगा आहे. सुमारे दोन वर्षापासून हे पती-पत्नी विभक्त राहत होते. लोक न्यायालयामध्ये तालुका विधी सेवा समितीच्या मध्यस्थीने आपसात तडजोड घडवून आणण्यात यश आले. यावेळी पती-पत्नीने एकमेकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि पत्नी मुलासह पतीकडे नांदविण्यास गेली. या खटल्यात पतीतर्फे अ‍ॅड.योगेश गजरे यांनी तर पत्नीतर्फे अ‍ॅड.दीपक एच.गाढे यांनी काम पाहिले.







यांनी घेतले परीश्रम
रावेर वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.शीतल जोशी, उपाध्यक्ष अ‍ॅड.बी.डी.निळे, सचिव अ‍ॅड.दीपक एच.गाढे, सहसचिव अ‍ॅड.किशोर पाटील, सरकारी वकिल श्रीकृष्ण दुट्टे, अ‍ॅड.टी.डी.पाटील, अ‍ॅड.व्ही.पी.महाजन, अ‍ॅड.आर.एन.चौधरी, अ‍ॅड.विपीन गडे, अ‍ॅड.योगेश गजरे, अ‍ॅड.सुभाष धूंदले, अ‍ॅड.जगदीश महाजन, अ‍ॅड.डी.डी.ठाकूर, अ‍ॅड.डी.ई.पाटील, अ‍ॅड.तुषार पी.चौधरी, अ‍ॅड.के.बी.खान, अ‍ॅड.आर.ए. पाटील, अ‍ॅड.एल.के.शिंदे, अ‍ॅड.उदय सोनार, अ‍ॅड.स्वप्निल सोनार, अ‍ॅड.सुवर्णा रावेरकर, अ‍ॅड.मेघनाथ चौधरी, अ‍ॅड.मुजाहीद शेख, अ‍ॅड.अमोल कोंघें, अ‍ॅड.मोहन कोचुरे, अ‍ॅड.शिवदास कोचूरे, अ‍ॅड.संदेश पाटील, अ‍ॅड.दीपक तायडे आदींनी व न्यायालयीन कर्मचारी सहा.अधीक्षक एल.आर.पाटील, वरीष्ठ लिपिक बी.के. तडवी, विधी सेवा समिती वरीष्ठ लिपिक आय.जी.इंगळे, भरत बारी, आर.आर.सोनवणे, शाहरुख पठाण, भूषण महाजन, दीपक ढिवरे, हेड बेलीफ पाचपोळ, स्टेनो मनोहर शिंपी, निखील पाटील, चेतन पवार, विश्वनाथ चौधरी, एस.एल.रावते, भगवान चौधरी यांनी परीश्रम घेतले. पंच न्यायाधिश म्हणून अ‍ॅड.संदेश पाटील यांनी काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !