पिळोद्यात धाडसी घरफोडी : दोघा आरोपींना फैजपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Daring burglary in Piloda : Faizpur police handcuffed two accused फैजपूर : फैजपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिळोदा येथे घराच्या गच्चीवरून प्रवेश करीत चोरट्यांनी साडेसात हजार रुपये किंमतीचे सोयाबीन कट्टे लांबवले होते. फैजपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांनी गोपनीय माहितीवरून गावातील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी व आकाश अशोक बोदडे (दोन्ही रा.पिळोदे बु. ॥, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बंद घरातून केली चोरी
पिळोद्यातील रहिवासी संदीप सुनील महाजन (38, मूळ रा.महाजनबाडा पिळोदा, ता.यावल, ह.मु.शांतीनगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार 6 ते 14 डिसेंबरदरम्यान जगदीश पाटील यांच्या घरात गच्चीवरून प्रवेश करीत चोरट्यांनी साडेसात हजार रुपये किंमतीचे सोयाबीन कट्टे लांबवले होते. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांत उर्फ चेतन मधुकर कोळी व आकाश अशोक बोदडे (दोन्ही रा.पिळोदे बु.॥) यांना अटक केली. त्यांच्याकडून 160 किलो वजनाचे चार सोयाबीन कट्टे व गुन्ह्यात वापरलेली मोटाससायकल जप्त केली.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक लोखंडे, मैनोद्दीन सैय्यद, हवालदार विकास सोनवणे, उमेश चौधरी, बाळू भोई, विजय परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.
