भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन


भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवार, 20 डिसेंबर 2023 रोजी थोर संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले.

स्वच्छता आणि चारीत्र्याची गाडगे महाराजांनी दिली शिकवण : प्राचार्य
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी-परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारीत्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत असत व अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक ते होते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.जयश्री सरोदे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.दीपककुमार जयस्वाल, शिक्षकेतर कर्मचारी किरण पाटील, राजेश पाटील, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर, प्रकाश सावळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !