भुसावळकरांसाठी मोठी पर्वणी : कल्पनिती शॉपिंग कार्निवलतर्फे उद्या फन मेळावा


Big celebration for Bhusawalkars : Kalpaniti Shopping Carnival will hold a fun gathering tomorrow भुसावळ : भुसावळ शहरात कल्पनिती शॉपिंग कार्निवलतर्फे मंगळवार, 26 डिसेंबर रोजी फन मेळावा वांजोळा रोडवरील बालाजी लॉनमागील शकुन इस्टेटमध्ये करण्यात आले आहे. नाताळच्या सुटीत भुसावळकरांसह बच्चे कंपनीला हा मेळावा मोठी पर्वणी ठरणार आहे.

50 हून अधिक स्टॉल : लहान मुलांसाठी विविध गेम शो
शहरात प्रथमच आगळ्या-वेगळ्या पद्धत्तीने आयोजित या मेळाव्यात विविध प्रकारचे 50 हून अधिक प्रकारचे स्टॉल थाटण्यात येणार आहेत शिवाय महिला व मुलांसाठी विविध गेम शो, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ शहरात प्रथमच आगळ्या-वेगळ्या पद्धत्तीने हा मेळावा होत असल्याने शहरवासीयांसह बच्चे कंपनीत या मेळाव्याविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.



एकाच छताखाली विविध वस्तूंची श्रृंखला
कल्पनिती शॉपिंग कार्निवलतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रकला, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्रसिद्ध जादूचे शो, गेम झोन, स्टॅण्ड अप कॉमेडी शो, केक वर्क शॉप, लाईव्ह बॅण्ड तबला नाईक आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत शिवाय 50 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विविध वस्तूंची श्रृंखलादेखील उपलब्ध होणार आहे. मंगळवार, 26 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत या शॉपिंग कार्निवलचे आयोजन करण्यात आले असून या सोबतच फूड व फन, लकी ड्रॉजचा आनंदही घेता येणार आहे.

स्टॉल बुकींगसाठी साधावा संपर्क
आपल्या नामांकीत वस्तूंच्या बॅण्ड्रींगसह कार्निवलमध्ये स्टॉल बुक करण्यासाठी निता जैन (98230-96411) व कल्पना शाह (99677-89512) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कल्पनिती शॉपिंग कार्निवलचा पत्ता-
‘शकुन इस्टेट’, बालाजी लॉनमागे, वांजोळा रोड, भुसावळ


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !