हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले


For dowry, the married woman was drowned in the farm बारामती :  हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. या घटनेत सुरेखा भाऊसाहेब गडदरे या विवाहितेचा मृत्यू झाला.

हुंड्यासाठी विवाहितेला मारले
लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली .




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !