सराफा दुकान फोडत 14 लाखांचे दागिने लांबवले
Jewelery worth 14 lakhs was stolen by breaking into a bullion shop सोलापूर : मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सराफा दुकान फोडत 14 लाख 20 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवले शिवाय जाताना चोरटे सीसीटीव्हीच्या डीव्हाईस घेवून गेल्याने माहितगार चोरटे असल्याचा अंदाज नातेपुतेच्या बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
मध्यरात्री केली चोरी
राजेश चंद्रशेखर चंकेश्वरा यांनी पोलिसात धाव घेतली. सोमवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आली. नातेपुते -वालचंदनगर रोडवर मुख्य बाजारपेठेत राजेश चंकेश्वरा यांचे खाली दुकान आणि वरच्या मजल्यावर घर आहे. रविवारी रात्री जेवण उरकून वरच्या मजल्यावर झोपी गेले. सोमवारी मध्यरात्री चोरयांनी उत्तर दिशेचे शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील मुख्य दरवाजाची चावी त्यांना मिळाली. दुकानाच्या मागील बाजूस भुशाचे पोते रिकामे करून या पोत्यात पैंजण आणि जोडवी त्यांनी टाकून नेली तर सोमवारी सकाळी सात वाजेदरम्यान दुकान मालकास चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या वायरी तोडून डिवाइस पळविल्याचे निदर्शनास आले.

