बोदवडच्या ऋषिकेश सावरीपागरचा नेपाळमध्ये डंका


बोदवड : बोदवड तालुक्यातील येवती येथील ऋषिकेश शांताराम सावरीपागर याच्यासह लोकेश संजय धनके, आनंद विजय सावळे,भूषण भागवत पाटील, निखिल श्रावणे या खेळाडूंनी नेपाळात आयोति विविध मैदानी स्पर्धांमध्ये विजय प्राप्त करीत केला. त्यांच्या या यशाबद्दल येवती गावातून या विजयी खेळाडूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

इंडो नेपाळ असोसिएशन चॅम्पियनशिपच्या वतीने नेपाळमधील पोखरा येथे विविध मैदानी स्पर्धा झाल्या. इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धा 18 ते 25 डिसेंम्बर दरम्यान नेपाळमधील पोखरा शहरात घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी कबड्डी व अ‍ॅथलेटिक्स प्रकारात बोदवड तालुक्यातील सहा खेळाडूंची निवड झाली होती.



या खेळाडूंचा नेपाळातही डंका
इंडो नेपाळ असोसिएशन चॅम्पियनशिप 2023-24 च्या सीजन तीनमध्ये, नेपाळ येथील पोखरा शहरातील मैदानावर झालेल्या रंनिंग स्पर्धेत येवती येथील ऋषिकेश शांताराम सावरीपागर याने 100 मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला यासोबतच ओम संजय विसाळे 100 मीटर प्रथम क्रमांक, लोकेश संजय धनके 200 मीटर प्रथम क्रमांक, आनंद विजय सावळे 100 मीटर प्रथम क्रमांक, भुषण भागवत पाटील 100 मीटर तृतीय क्रमांक, निखील श्रावणेने 200 मीटरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व विजयी झालेल्या स्पर्धकांचे बुधवर. 27 रोजी बोदवड रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. शुभम रामदास पाटील, अमोल विलास पाटील, डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी खेळाडूंचा सत्कार केला. रामदास पाटील यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. खेवलकर कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये ही स्वागत करण्यात आले व येवती गावाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम करून गावामधून भव्य मिरवणूक काढून सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ऋषिकेशने या अगोदर राज्यस्थानच्या जयपूर येथे तीन किलोमीटर धावण्यात सुवर्ण पदक, 800 मीटरमध्ये कांस्य पदक, त्यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेत 100 मीटर सुवर्ण पदक पटकावले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !