भुसावळात श्री दत्त जयंतीनिमित्त अयोजित सप्ताहाची सांगता
भुसावळ : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) नंदनवन कॉलनी केंद्रात आयोजित अखंड नाम, जप व यज्ञ सप्ताहाची बुधवारी सकाळी 1030 वाजता महानैवेद्य आरती सांगती झाली.
सप्ताहात विविध कार्यक्रम
सप्ताह कालावधीत भुसावळ सेवा केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहात विविध सेवा करण्यात आल्या. अखंड प्रहर सेवा, गणेश याग, मनोबोध याग, चंडीयाग, रुद्र याग, गीताई याग, स्वामी याग, मल्हारी याग असे विविध याग करण्यात आले. अखंड प्रहर सेवेसाठी शहरी व ग्रामीण भागातील बहुसंख्य स्त्री-पुरुष सेवेकर्यांनी सेवा रुजू केली तसेच श्री स्वामी समर्थ मंत्र जप 23 लाख 75 हजार 676 , श्री नवार्णव मंत्र जप 80 हजार 892, श्री गायत्री मंत्र माळजप 43 हजार 416, श्री महामृत्युंजय मंत्र माळ जप 37 हजार 152, दुर्गा सप्तशती पाठ 108, श्री स्वामी चरित्र सारामृत 136, श्री रुद्र पाठ 01, श्री मल्हारी सप्तशती 08, सामुदायीक श्री गुरुचरित्र पारायण 146 आदी सेवेकर्यांनी या विविध सेवा श्रद्धेने केल्या.


सप्ताह काळात ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत 18 ग्राम अभियानचे विविध स्टॉल लावण्यात आले. त्यावर माहिती देण्यात आली. सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी भुसावळ शहर व भुसावळ तालुक्यातील सर्व स्वामी सेवेकार्यांनी सहभाग घेतला.
