दीपनगरात तीन कोटी 72 लाखांच्या विकासकामांना मंजुरी


सीएसआर निधीतून होणार कामे : खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर भुसावळ अंतर्गत बाधीत असलेल्या गावांना औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत तीन कोटी 72 लाख 40 हजार दोनशे पाच रुपयांच्या विकास कामांना औष्णिक विद्युत केंद्र दीपनगराकडून मंजुरी मिळाली आहे. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ अंतर्गत बाधित असलेल्या गावांकडून सी.एस.आर. निधीची मागणी करण्यात येत होती. खासदार रक्षा खडसे यांनपी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर, भुसावळ यांच्याकडे वारंवार विकासकामांसाठी निधीबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार दुसखेडा, फेकरी, गहुखेडा, जाडगांव, कपिलनगर, कासवा, कठोरा बु., कठोरा खु., मण्यारखेडा, निंभोरा बु. फुलगांव, रायपूर, रणगांव, साकरी, सूदगांव, वेल्हाळे, पिंप्रीसेकम अशा एकूण 17 गावांना गावांतर्गत रस्ते व गटार काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !