रायगड जिल्ह्यात बस अपघातात दोघे महिला ठार : 55 जखमी


Two women killed in bus accident in Raigad district : 55 injured रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ खाजगी बसला अपघात झाल्यानंतर दोघे महिला ठार झाल्या असून 55 प्रवासी जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास ताम्हिणी घाटात हा अपघात घडला. पुणे येथील खासगी कंपनीची ही बस कोकणात येत असताना ही दुर्घटना घडली.

घाटात बस उतरर्‍याने अपघात
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच 04 एफके 6299म ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी झाली. त्यात दोघे महिला ठार झाल्या तर 55 सहप्रवासी जखमी झाले.घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !