भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावर चाकूहल्ला : 22 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल
संशयित गुन्ह्यानंतर पसार : पोलिस कर्मचार्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ
Knife attack on Bhusawal market police station employee : A case has been registered against a 22-year-old youth भुसावळ : कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावरच 22 वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केला. ही खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परीसरात रविवारी दुपारी दोन वाजता घडली. या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय मोहन चव्हाण (32) जखमी झाले असून स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले आहे. दरम्यान, चाकू हल्ला करणार्या सुनील व्यंकय्या मैलेलू (22, भुसावळ) विरोधात पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोसिात गुन्हा दाखल करण्यात आला.
मदतीला आलेल्या पोलिसावरच हल्ला
शहरातील शिवदत्त नगरात रेल्वेतील निवृत्त कर्मचारी व्यंकय्या मैलेलू हे पत्नी व मुलगा सुनीलसह वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी मैलेलू दाम्पत्याचा मुलगा सुनील मैलेलू (27) हा आई-वडिलांना शिविगाळ करीत त्यांचा खून करण्याची धमकी देत असल्याने त्रस्त कुटूंबाने मदतीसाठी पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करीत मदत मिळण्याची अपेक्षा केली. भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण (32) हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास मैलेलू यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सुनीलने किचनमधील पडलेला चाकू घेत अचानक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्यात जखम झाली तर यावेळी संशयिताने पाय ओढल्याने जमिनीवर पडून चव्हाण हे जखमी झाले व त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. चव्हाण यांनी तातडीने बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना उपचारार्थ डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवल्यानंतर अधिक उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले तर संशयित मात्र पसार झाला.


संशयित तरुणाविरोधात गुन्हा
रविवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात जखमी पोलिस अक्षय चव्हाण याच्या फिर्यादीवरून सुनील व्यंकय्या मैलेलू (27) या तरुणाविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहे.
