भुसावळ शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर ठणठणाट : आज दुपारनंतर पेट्रोल उपलब्ध होणार

ग्राहकांची पंपावर उसळली तोबा गर्दी : संप मागे घेतल्याने नागरीकांना दिलासा


All the petrol pumps in Bhusawal city are busy : Petrol will be available after this afternoon भुसावळ : हिट अ‍ॅण्ड रन कायद्याच्या विरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी देशातील ट्रक व डंपर चालकांनी संप पुकारला असतानाच दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी या संपात सहभागी झाल्याने पेट्रोलसह डिझेलचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यातच शहरातील वाहनधारकांनी सर्वच पेट्रोल पंपावर सोमवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यानंतर शहरातील सर्वच पंपावर मंगळवारी दुपारी ठणठणाट दिसून आल्याने अनेक वाहनधारकांना रीकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, नागरीकांनी वाहनांऐवजी खाजगी वाहतुकीला पसंती दिल्याने खाजगी वाहनधारकांनी भाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. संप मागे घेण्यात आल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजपासून पेट्रोल पंप पूर्ववत होणार
हिट अ‍ॅण्ड रन कायद्याविरोधातील संपात नाशिक जिल्ह्यातील एक एक हजार 500 टँकरचालक उतरल्यानंतर मंगळवारी मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्याचे मान्य केल्याने नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मिटल्याने मंगळवारी दुपारपर्यंत शहरातील पेट्रोल पंप पूर्ववत सुरू होणार आहेत.



भुसावळात सर्वच पेट्रोल पंपावर ठणठणाट
भुसावळ शहर व परीसरात तब्बल 11 पेट्रोल पंप आहेत मात्र सोमवारी रात्रीपासून उसळलेल्या गर्दीमुळे मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच पंपावर इंधन संपल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. शहरातील गांधी पुतळ्याजवळील कपूर पंप सोमवारी दुपारी बंद पडला तर भुसावळ गॅस एजन्सीचा पंप मंगळवारी दुपारी बंद झाला. जळगावरोडवरील भोळे पंपाचा पेट्रोल साठा देखील सोमवारी रात्री संपला तर जळगावरोडवरील ज्वाली पंप दुपारपर्यंत सुरू होता मात्र वाढलेल्या गर्दीनंतर येथील साठाही संपला तर जळगावरोडवरील तिन्ही पंप दुपारी साठा संपल्याने बंद झाले. महामार्गावरील दोन पैकी केवळ एक पंप सुरू होता मात्र त्याचाही नंतर साठा संपल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना भाडे वाढीचा फटका
बसस्थानकाबाहेर चालणार्‍या अवैध वाहतूक दारांनी संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर भाडे वाढ केली तर खाजगी रीक्षा चालकांनी संधीचे सोने केल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री बसली. बसस्थानकात मात्र प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र होते. शहरातील रीक्षा स्टॉपवर इंधनाअभावी रीक्षा उभ्या दिसून आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !