सोशल मिडीयावर फोटो टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Minor girl assaulted by threatening to post photos on social media जळगाव : सोशल मिडीयावर फोटो एडीट करुन टाकण्याची धमकी देत 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
धमकी देत केला अत्याचार
17 वर्षीय पीडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडीता व विधीसंघर्ष बालक हे जळगाव शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असताना जुलै 2022 पासून ते मार्च 2023 पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पीडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शारीरीरीक संबंध केले. याप्रकरणी भा.दं.वि कलम 376 (2) (छ), 506, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.


