नाशिकमधील हायप्रोफाईल घरफोड्यांची उकल : मॅकेनिकल इंजिनिअरसह मित्राला बेड्या
Solving high profile house burglaries in Nashik : Mitra shackled with a mechanical engineer नाशिक : हायप्रोफाईल वस्तीत रेकी करून घरफोड्या करणार्या नाशिकमधील मॅकेनिकल इंजिनिअरसह मित्राला बेड्या नाशिक गुन्हे शाखा एकच्या युनिटने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी चार घरफोड्यांची कबुली दिली आहे. चोरीची कार, 3 0ग्रॅम सोने व घरफोडीसाठी वापरणारे आधूनिक साहित्य मिळून सात लाख 53 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित रोहन संजय भोळे (36, रा.उपनगर) व ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे (27, रा.नाशिकरोड) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना शनिवार, 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गंगापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याची उकल
गंगापूर रोड परीसरातील शारदा नगरमधील शरण बंगल्याच्या किचनच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आतमध्ये प्रवेश करत चोरांनी रोख रक्कम, सोन्याचे कॉइन, महागडे ब्रॅन्डेड घड्याळ, गोदरेजची लोखंडी तिजोरी असा सुमारे दोन लाख 31 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला होता. याप्रकरणी यश हरिष हेमदानी (30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिसात गुन्हा दाखल होता.


गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
तांत्रिक विश्लेषण करत वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी तपासाला गती दिली. दरम्यान, संशयित हे गुजरातच्या वापी परीसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. संशयित रोहन संजय भोळे (36, रा.उपनगर), ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे (27, रा.नाशिकरोड) यांना अटक करण्यात आली. या दोघा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सराईत गुन्हेगार; घरफोडीचे चार गुन्हे उघड
संशयित रोहन हा मॅकेनिकल इंजिनिअर असून ऋषिकेश हा पदवीधर आहे. त्यांची कसून चौकशी केली असता गंगापूर परिसरातील दोन व ओझर, सिन्नर येथील एक असे एकूण घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्हे केल्याची माहिती आहे.
