चोरीच्या पाईपासह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त : चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी


Assets worth one and a half lakhs including stolen pipes seized: Chalisgaon city police performance चाळीसगाव  : शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान चोरीच्या पाईपाची वाहतूक करणार्‍या पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाच अटकेत : एक पसार
पोलिसांनी चालक अशोक विश्वनाथ पवार (27), वाल्मीक साहेबराव सोनवणे (45, दोन्ही रा.पाण्याच्या टाकीजवळ, डेराबर्डी, चाळीसगाव), राहुल रावसाहेब पाटील (31, रा.भोरस खुर्द, हनुमान मंदीराजवळ), रवींद्र नागो राजपूत (52, नवेगाव मेहुणबारे), रोशन युवराज मोरे (23, दसेगाव, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे असून अन्य एक संशयित किरण मस्के पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.



संशय येताच आवळल्या मुसक्या
धुळे रोडवरील डेराबर्डी परीसरात असलेल्या साने गुरुजी शाळेसमोर रोडवर मेहुणबारे गावाकडून चाळीसगाव शहराकडे एक टाटा एस (छोटा हत्ती) वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले. वाहन चालकास त्यांनी थांबविण्याचा इशारा केला, परंतु चालकाने त्याचे ताब्यातील टाटा एस ( छोटा हत्ती) वाहन न थांबविता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे नेल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केल्यानंतर पुन्शी पेट्रोल पंपाच्यापुढे वाहनास थांबविल्यानंतर संशयिताना खाकी दाखवताच त्यांनी वाहनात चोरीचे पाईप असल्याची कबुली दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एएसआय शशिकांत महाजन, चालक नितीश पाटील, संदीप पाटील, तसेच गुन्हे प्रकटीकरण हवालदार प्रशांत पाटील, दीपक पाटील, अमोल भोसले, अजय पाटील, नंदकिशोर महाजन, मोहन सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !