कुविख्यात गँगस्टर शरद मोहोळ गोळीबारात ठार
Notorious gangster Sharad Mohol killed in firing पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजता घडली होती. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली आहे.
एका आरोपीचे नाव निष्पन्न
दरम्यान शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणार्या एका आरोपीची ओळख पटली आहे. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.


गोळीबारानंतर संशयित झाले पसार
कुख्यात गुंड शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकर्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. अगदी जवळून त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या लागल्याने शरद मोहोळ गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणार्या एका आरोपीची ओळख पटली असून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
