18 लाखांची रोकड असलेले एटीएम मशीनच चोरट्यांनी लांबवले : संग्रामपूरात खळबळ


Thieves stole the ATM machine with 18 lakh cash: Sangrampur stirs संग्रामपूर : चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याचा प्रकार संग्रामपूरात रविवार, 7 रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुमारे 18 लाखांची रोकड होती. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

काही क्षणात केली चोरी
रविवारी पहाटे तीन वाजता दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला वायर रोपच्या सहाय्याने त्यांनी चारचाकीला लावून बाहेर ओढले व काही वेळात ते पसार झाले. पळवून नेलेल्या एटीएम मशीन मध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे.



पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे चोरट्यांनी विना क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा वापर केला. तामगाव पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच यामूळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !