अजहर खान यांचा उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कारने सन्मानित
पाचोरा : दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन व क्रीडा साधना, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्काराचे नुकतेच श्री कालिका देवी मंदिर संस्थानमध्ये वितरण करण्यात आले. त्यात पाचोरा अँग्लो उर्दू हायस्कूलचे क्रीडा शिक्षक मोहम्मद अजहर खान फरीद खान यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
यांची होती उपस्थिती
ऑलंम्पिक पदक विजेते व खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रंजीत खशाबा जाधव, अण्णासाहेब पाटील, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता आनंद खरे यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. दरम्यान,
अजहर खान सर यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शेख इकबाल सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.



