शतपावली करताना धूम स्टाईल मोबाईल लांबवला : जळगावातील संशयिताला बेड्या
Dhoom style mobile phone extended during Shatpavali: Suspect in Jalgaon handcuffed जळगाव : शतपावली करणार्या प्रौढाच्या हातातून धूम स्टाईल त्रिकूटाने मोबाईल लांबवला होता. ही घटना मानराज पार्कजवळ घडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी तपास चक्रे फिरवित लागलीच संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी (19, रा.शिवकॉलनी जळगाव, मूळ रा.साकेगाव, ता.भुसावळ) याला शिवकॉलनीतून अटक केली आहे तर दोघ साथीदारांचा शोध सुरू आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली.
बोलत असताना लांबवला मोबाईल
जळगाव शहरातील मानराज पार्कमधील दौप्रदी नगरात सुमित एकनाथ भामरे (57) हे वास्तव्यास असून ते जनता बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. बुधवार, 10 जानेवारी रोजी रात्री जेवण केल्यानंतर भामरे हे फोनवर बोलत शतपावली करण्यासाठी निघाले. अॅक्सीस बँकेकडून ते शतपावली करीत असतांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन ट्रिपलसीट आलेल्या चोरट्यांनी भामरे यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. त्यानंतर भामरे यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसात सुमित भामरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय माहितीवरून कारवाई
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना संशयित हे त्याच परिसरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक मीा देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलिस नाईक जुबेर तडवी, पोलिस कॉन्सटेबल अमित मराठे यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी याला रात्री 11 वाजता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली.
