खडसेंनी राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी : जळगावात गुलाबराव पाटील
Khadse should take care that NCP does not split : Gulabrao Patil in Jalgaon जळगाव : खडसेंनी राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल समोर आल्यानंतर त्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घटनेतील टी शोधून हा निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसेंवर टिकेचे बाण चालवले आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
राऊंतांना दिली भूताची उपमा
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतासारखे भूत आवरावे हाच आपला उध्दव ठाकरे यांना सल्ला असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. ज्यांना घटना सुद्धा माहित नाही ते काय पक्ष चालवणार, ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना ही मोठी चपराक असल्याचे ही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावात गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आम्ही गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.


