जळगावात वाहनचालक सेक्सटॉर्शनचा बळी : अश्लील व्हिडिओ बनवत उकळली 65 हजारांची खंडणी


Driver sextortion victim in Jalgaon : Extortion of 65 thousand for making obscene video जळगाव : मैत्री करण्याच्या बहाण्याने फ्लॅवर बोलावत नंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करीत चालकाकडून 65 हजारांचा ऐवज लुटण्यात आला. ही धक्कादायक घटना जळगावच्या तहसील कार्यालयाजवळील एका इमारतीत तसेच आव्हाणे शिवारात घडली. याप्ररकणी जळगाव शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन तरुणांचा समावेश आहे.

ब्लॅक करीत लुटणारे रॅकेट सक्रिय
जळगाव शहरातील तहसील कार्यालय परीसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅटमधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. चालक इमारतीत संबंधित महिलेला भेटण्यास गेला. त्या ठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करत त्या महिलेसोबत सेक्स करतानाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. तसेच चौघांनी मिळून चालकाकडून 65 हजार रुपये किंमतीचे दागिने, मोबाईल व रोकड असा एकूण 65 ऐवज काढून घेण्यात आला.



चौघांविरोधात गुन्हा दाखल
ब्लॅकमेलिंग करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तयार करण्यात आलेला अश्लिल व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत चालकाकडून अजून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. ती वसुल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !