जळगाव जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांसह 23 एपीआय व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्या
जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी फिरवली भाकरी : तत्काळ सोडावा लागणार पदभार
Transfer of 23 APIs and 20 Sub-Inspectors including three Police Inspectors in Jalgaon District भुसावळ : जळगाव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणार्या अधिकार्यांच्या बदल्या जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शनिवारी सायंकाळी केल्या आहेत. तीन पोलिस निरीक्षक, 23 सहाय्यक निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांमध्ये समावेश आहे. तत्काळ पदभार सोडण्याचे आदेशही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
जळगावातील तीन निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव यांची जळगाव नियंत्रण कक्षात तसेच रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.



