जळगावात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीवर विळ्याने हल्ला


In Jalgaon, a husband attacked his wife with a sickle due to a family dispute जळगाव :कौटूंबिक वादानंतर संतप्त पतीने पत्नीवर विळ्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी हरीविठ्ठल नगरात घडली. या प्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीविरोधात गुन्हा दाखल
तांबापूरा येथे राहणार्‍या तडवी दाम्पत्यामध्ये वाद असल्याने पत्नी शहनाज या माहेरी हरीविठ्ठल नगरात निघून गेल्या. त्यांना घेण्यासाठी अजित तडवी हा शुक्रवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हरीविठ्ठल नगर येथे गेला असता तेथे वाद झाला. त्यावेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे पत्नीने सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी केले व तू माझ्यासोबत नांदायला आली नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली.



या प्रकरणी शहनाज तडवी यांनी रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पती अजित तडवी विरुद्ध सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !