जळगाव जिल्ह्यातील 23 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या : जाणून घ्या नियुक्तीचे ठिकाण
तीन पोलिस निरीक्षकांना साईडब्रँच : 20 फौजदारांचेही बदलले ठाणे
Transfers of 23 Assistant Police Inspectors in Jalgaon District : Know Place of Appointment भुसावळ : जळगाव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणार्या अधिकार्यांच्या बदल्या जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शनिवारी सायंकाळी केल्या आहेत. त्यात तीन पोलिस निरीक्षक, 23 सहाय्यक निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांमध्ये समावेश आहे. तत्काळ पदभार सोडण्याचे आदेशही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील 23 सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या व मिळालेले ठिकाण असे
कासोद्याच्या सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे यांची जिल्हा विशेष शाखेत, जळगाव शहरचे किशोर पवार यांची भुसावळ शहर, एमआयडीसीचे अमोल मोरे स्थानिक गुन्हे शाखेत, भुसावळ तालुक्याचे अमोल पवार यांची एरंडोल पोलिस ठाण्यात, भुसावळ शहरचे अनिल मोरे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, चाळीसगाव शहरचे विशाल टकले यांची चोपडा शहर, चोपडा शहरचे अजित साळवे यांची अमळनेर, अडावदचे गणेशपुरी बुवा यांची जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहरचे निलेश गायकवाड यांची जळगाव शहर, यावलचे विनोद गोसावी यांची चाळीसगाव ग्रामीण, मुक्ताईनगरचे संदीप दुनगहू यांची जामनेर, मेहुणबार्याचे संदीप परदेशी यांची चाळीसगाव अपर अधीक्षकांचे रीडर, मारवडचे शीतल नाईक यांची मुक्ताईनगर, एरंडोलचे गणेश अहिरे यांची भुसावळ तालुका, चाळीसगाव शहरचे दीपक बिरारी भुसावळ बाजारपेठ, पिंपळगाव हरेश्वरचे महेंद्र वाघमारे भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहरचे रवींद्र बागुल अमळनेर, जिल्हापेठचे किरण दांडगे टीएमसी, पाचोर्याचे राहुल मोरे जळगाव शहर, चाळीसगाव ग्रामीणचे धरमसिंग सुंदरडे यावल, भुसावळ बाजारपेठचे मंगेश गोंटला चाळीसगाव शहर, भुसावळ बाजारपेठचे हरीष भोये पाचोरा, एएचटीयूच्या निता कायटे यांची जळगाव शहर पोलिसात बदली करण्यात आली.


जळगावातील तीन निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव यांची जळगाव नियंत्रण कक्षात तसेच रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
