जळगाव शहरात 23 वर्षीय महिलेचा विनयभंग
23-year-old woman molested in Jalgaon city जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी परीसरातील एका भागात राहणार्या 23 वर्षीय महिलेचा दोघा विधी संघर्षीत मुलांनी अश्लिल हावभाव करीत व करत हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार शनिवार, 13 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता समोर आला. याप्रकरणी रात्री आठ वाजता एमआयडीसी पोलिसात ठाण्यात विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
महिलेचा केला विनयभंग
सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात 23 वर्षीय महिला आहे. आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 13 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता महिला ही घरी असताना त्याच भागातील दोन अल्पवयीन असलेल्या मुलांनी त्यांच्याकडून पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने रात्री आठ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. विधीसंघर्षित असलेल्या दोन मुलांवर एमआयडीसी पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.


