चोरीची मोटारसायकल खरेदी करणे भोवले : एरंडोलच्या संशयिताला बेड्या


Arrested for buying stolen motorbike : Erandol suspect in shackles जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने चोरीची दुचाकी असल्याचे माहित असतानाही ती खरेदी करणार्‍या एरंडोलच्या संशयिताला अटक केली आहे. फारुख हुस्नोद्दीन शेख असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

असे आहे चोरीच्या दुचाकीचे प्रकरण
एरंडोलमधील संशयित फारुख हुस्नोद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटारसायकल विकत घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कारवाईचे दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार सुनील दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नाईक भगवान पाटील, राहुल बेसाणे, अशोक पाटील, ईश्वर पाटील आदींनी संशयिताला ताब्यात घेतले.



आरोपीचा जळगाव शहर पोलिसांनी घेतला ताबा
तपास पथकाने फारुख हुस्नोउद्दीन शेख (रा.मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल) यास अटक केली असून त्याने ही दुचाकी सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा. पथराड ता. भडगाव) याच्याकडून खरेदी केल्याचे मान्य केले. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला तपासकामी दुचाकीसह जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !