ट्रकला बनावट नंबरप्लेट लावत शेतकर्‍यांकडील दहा लाखांचे पांढरे सोने परस्पर विकले


By putting fake number plates on the trucks, white gold worth 10 lakhs from the farmers was sold to each other पारोळा : ट्रकला बनावट नंबर प्लेट लावत शेतकर्‍याकडील तब्बल दहा लाख रुपये किंमतीचा कापसाची परस्पर विक्री करून शेतकर्‍यांना गंडा घातल्याचा प्रकार पारोळा तालुक्यातील शेवगे बु.॥ येथे घडला आहे. याप्रकरणी ट्रक चालकासह व्यापारयाविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
शेतकरी अशोक नथ्थू पाटील (53, शेवगे बु.॥, ता.पारोळा) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी हसीन रशीद खानुबेगवाला (47, रा.107, अक्सानगर, मेहरुण, जळगाव) याने शेतकर्‍यासह फिर्यादी यांच्याकडील कापूस गुजरातच्या कढी येथे विक्रीसाठी घेवून जातो म्हणत अन्य कुठल्यातरी मालट्रकला क्रमांक जी.जे.02 एक्स.एक्स.1075 ची खोटी नंबरप्लेट लावली व नऊ लाख 96 हजार 120 रुपये किंमतीचा कापूस भरला मात्र गुजरातच्या कढी येथे व्यापारी व चालक पोहोचलाच नाही. रस्त्यात दोघांनी संगनमताने कापसाची कुठेतरी विल्हेवाट लावली. शेतकर्‍याने संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही व आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर शेतकर्‍यांनी पारोळा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. मालट्रक वरील चालक व हसीन रशीद खानुबेगवाला (47, रा.107, अक्सानगर, मेहरुण, जळगाव) यांच्याविरोधातसंगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !