शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या आमिषाने जळगावच्या विवाहितेला दहा लाखांचा गंडा


Jalgaon’s married woman was cheated of 10 lakhs by the lure of extra profit in the share market जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष देत जळगावातील 33 वर्षीय विवाहितेला तब्बल दहा लाखांचा गंडा घालण्यात आला मात्र रक्कम गुंतवणूक करूनही कुठलाही परतावा न मिळाल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने महिलेने सायबर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
दीपाली मकरंद चौधरी (33, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2024 दरम्यान अभिलाषा, अल्बर्ट त्रिवेदी, अक्षय ठाकूर नाव सांगणार्‍या संशयितांनी विविध क्रमांकावर संपर्क साधला तसेच 8734046324 या क्रमांकावरून संपर्क साधून अ‍ॅपेक्स कंपणीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. वेळोवेळी ऑनलाईन नऊ लाख 82 हजार 50 रुपये स्वीकारण्यात आले मात्र मुद्दल वा जादा रक्कमेचा परतावा देण्यात आला नाही शिवाय संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महिलेने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल. तपास प्रभारी निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !