जळगाव पोलिस दलातील दोन निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या

23 सहाय्यक निरीक्षकांसह 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या रद्द : पोलिस दलातील बदल्यांमध्ये फेरबदल


Transfers of seven Assistant Inspectors including two Inspectors in Jalgaon Police Force भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस दलातील एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणार्‍या तीन पोलिस निरीक्षक, 23 सहाय्यक निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या 12 जानेवारी रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुधारीत आदेशानुसार दोन निरीक्षक, सात सहाय्यक निरीक्षक व चार पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहेत.

दोघा निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत तर चाळीसगाव ग्रामीण निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.



सात सहाय्यक निरीक्षकांल्या बदल्या
सुधारीत आदेशानुसार जळगाव शहरचे किशोर पवार यांची भुसावळ शहर, एमआयडीसीचे अमोल मोरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, भुसावळ तालुक्याचे अमोल पवार यांची एरंडोल शहर पोलिस ठाण्यात, भुसावळ शहरचे अनिल मोरे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, चाळीसगाव शहरचे विशाल टकले यांची चोपडा शहर, चोपडा शहरचे अजित साळवे यांची अमळनेर पोलिस ठाण्यात, अडावदचे गणेशपुरी बुवा यांची जळगाव शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

चार पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
पाचोर्‍यातील विजया वसावे एमआयडीसी पोलिस ठाण्यात, मेहुणबारेचे प्रकाश चव्हाणके पाचोरा, नियंत्रण कक्षातील राहुल तायडे जिल्हा विशेष शाखेत तर अमळनेरचे विकास शिरोळे यांची मेहुणबारे पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

दरम्यान, बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तातडीने आदेश मिळताच बदलीस्थळी हजर राहून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे बदली आदेशात पोलिस अधीक्षकांनी नमूद केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !