विटांना भरलेला आयशर कलंडला : अजिंठ्याचा मजुराचा मृत्यू


Brick-filled Eicher Kalandala : Ajantha’s Death of a Labourer जळगाव : विटा वाहतूक करणारा आयशर कलंडल्याने एका मजुराचा दबला जावून करुण अंत झाला. ही घटना गुरुवार, 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नेरी गावाजवळ घडली आहे. श्याम कुमार तुलसीराम पाठे (34, रा.अजिंठा, ता.जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ढापा तुटल्याने अपघात
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथून आयशर क्रमांक (एम.एच.04 डी.डी. 7709) हा गुरुवार, 18 जानेवारी रोजी विटा भरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथे जात होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळून जात असताना रस्त्यावरील पुलाचा धापा तुटल्याने अचानक आयशर ट्रकचे चाक फसले. त्यातच ट्रक हा कलंडला गेला. यामध्ये श्यामकुमार तुलसीराम पाठे हा तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबतचे सुनील भड्या कोठोडे (33), शेख शकील शेख सलीम (32) आणि सलमान खान युसूफ खान (सर्व रा.अजिंठा, जि.छत्रपती संभाजीनगर) असे तिघे जखमी झाले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !