चोपडा शहरात तोतया अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांकडून पाच लाखांची खंडणी : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Chopra fake extortion of five lakhs from Food and Drug Administration officials: Crime against the trio चोपडा : अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याची थाप मारत अवैध गुटखा विक्रेत्याकडे पाच लाखांची खंडणी मागणार्या त्रिकूटाविरोधात चोपडा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित पसार झाला आहे.
तोतया अधिकार्यांनी मागितली खंडणी
चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परीसरात शुक्रवारी दुपारी दिड वाजता तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले. याची माहिती मिळताच अमृतराज सचदेव यांनी तत्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदरची बाब कळविली व घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांचे पथक गेले असता त्यांना संशयित आरोपी संशयितरित्या तोतयारी करताना आढळले.


कारवाईची भीती घालत मागितली खंडणी
फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (28, लोहियानगर) यांना तिघां संशयितांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवले तसेच सोलापूर विभागात पोलिस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (35, रा.साकटी रोड, पंढरपूर, जि.सोलापूर), विनायक सुरेश चवरे (35, रा.721, गोविंदपुरा सोलापूर रोड, गुर्जर वाडा, जि.सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली. संशयितयांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
चारचाकी वाहनही जप्त
गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन देखील जप्त केले आहे. दरम्यान, वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली आहे.
