‘ते’दोघे पोलिस कर्मचारी जळगाव नियंत्रण कक्षात
‘They’ are both police personnel in the Jalgaon control room जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोबाईलसह इतर मदत करणार्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलातील वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली असून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
या कारणामुळे नियंत्रण कक्षात उचलबांगडी
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या किरणकुमार बकाले यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यापूर्वी मोबाईल, इअर बर्ड देऊन बोलण्याची सोय करून देण्यात आली होती. याप्रकरणी मराठा समाजाने आक्षेप घेत चौकशी व संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.


