वाहनात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करताना स्फोट : पारोळा पोलिसात एकाविरोधात गुन्हा


Explosion while refilling gas illegally in vehicle : A case against one in Parola police पारोळा : पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसलीतरी या घटनेत 21 पैकी नऊ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर दोन्ही वाहने खाक झाली होती. याप्रकरणी पुरवठा अधिकारी विश्वजीत सिंह विजयसिंह गिरासे (38, नकाणे रोड, धुळे) यांच्या फिर्यादीवरून खंडेराव रामराव पाटील उर्फ मोठाभाऊ (म्हसवे, ता.पारोळा) यांच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहने जळाल्याने दोन लाखांचे नुकसान
सूत्रांच्या माहितीनुसार, म्हसवे शिवारातील प्रभू केमिकल्समागे खंडेराव पाटील व अन्य मोकळ्या जागेत गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या ओमनी वाहनात गॅस रीफिलिंग करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी तब्बल 21 सिलिंडरपैकी नऊ सिलिंडरचा स्फोट झाला. दोन्ही ओमनी पेटून दोन लाखांचे नुकसान झाले. तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !