पाचोर्‍यात धाडसी घरफोडी : सव्वा सात लाखांचे दागिने लांबवले


Daring house burglary in Pachora : Jewels worth 7.5 lakhs were recovered पाचोरा : कुटूंब गाढ झोपे असताना चोरट्यांनी बेडरूमच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल सात लाख 21 हजारांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडसी घरफोडीमुळे पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी भागात नागरीक धास्तावले आहेत. अज्ञात चोरट्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केली चोरी
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दिनेश एकनाथ तावडे (40, रा.स्टेट बँक कॉलनी, भडगाव रौड. पाचोरा) हे शुक्रवारी रात्री टीव्हीवरील कार्यक्रम बघून 12 वाजता झोपल्यानंतर चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापले व घरात प्रवेश करीत कपाटातील सात लाख 21 हजार रुपये किंमतीचे व 23 तोळे व आठ ग्रॅम वजनाचे दागिणे व सात हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार शुक्रवार, 19 रोजी रात्री घडली तर शनिवरी शनिवारी सकाळी सात वाजता तावडे यांच्या पत्नीला बेडरूमचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे, प्रभारी निरीक्षक किरण शिंदे व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !