बोकडाला धडक दिल्याच्या रागातून कारची तोडफोड : महिलेचे मंगळसूत्रही लांबवले


Car vandalized out of anger for hitting a buck : Woman’s mangalsutra was also extended धरणगाव : बोकडाला ठोस मारल्याच्या संशयातून कार चालकाला बेदम मारहाण करीत कारची तोडफोड करण्यात आली तर चालकाच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोतही लांबवल्याची घटना पारोळा नाक्याजवळ रविवारी सायंकाळी घडली. या संदर्भात प्रशांत समाधान नेरकर (वय : 26 वर्ष, व्यवसाय मार्केटींग रा. रोटवद ता धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

बोकडाला धडक दिल्याच्या गैरसमजातून कारचे नुकसान
फिर्यादीत नेकर यांनी म्हटले आहे की, रविवार. 21 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते परिवारसह धरणगाव-चोपडा रोडने घरी जात असतांना सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पारोळा नाक्याजवळ त्यांची कार (क्र एम.एच.19 ई.जी.2017) समोर डावीकडून एक बोकड आला व नेरकर यांनी कार थांबली. तेव्हा रस्त्याचे डाव्या बाजुस उभे असलेल्या चार अज्ञात लोकं गाडी जवळ धावत आले व मी बोकड्याला ठोस मारली , असे समजून त्यांनी गाडीचे काच फोडुन गाडीची डिक्की दाबून सुमारे 15 हजारांचे नुकसान केले.



तसेच नेरकर यांना नाकावर, तोंडावर तसेच इतर ठिकाणी प्लॉस्टीकचा पाईप व काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, त्यांच्या आईच्या अंगावर धावून जावुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आलीव यांच्या गळ्यातील अंदाजे 8 ग्रॅम सोन्याचे पँडल असलेली पोत चौघां संशयित आरोपीपैकी एकाने जबरीने ओढुन नेली. याप्रकरणी चार अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !