चाळीसगावात पाच जुगारी पोलिसांच्या जाळ्यात : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त


Five gamblers caught by police in Chalisgaon: 2 lakh worth of goods seized चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करीत पाच जुगार्‍यांना ताब्यात घेतले. ही कारवाई मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्यावर करण्यात आली. झन्ना-मन्ना खेळणार्‍या जुगार्‍यांकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य व दुचाकी असा एकूण एक लाख 72 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार, 22 जानेवारी रोजी रात्री छापा टाकला. या कारवाईत जॉनी ऊर्फ मुन्ना सुंदर काळे (38, पवारवाडी, चाळीसगाव), मिर्झा ईमरान मोहसीन बेग (44, पवारवाडी), अमोल दिलीप जैस्वाल (45, पवारवाडी), खुशाल अनिल जैस्वाल (39, स्टेशन रोड मशिदीजवळ चाळीसगाव) व किरण सीताराम गवळी (32, साने गुरूजी नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा एकूण एक लाख 72 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. तपास नाईक भूषण पाटील करीत आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, नितीन वाल्हे, भूषण पाटील, महेंद्र पाटील, भरत गोराळकर, राकेश महाजन, विजय पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !